मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मेहरु बेंगाली यांचे बुधवारी अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चाच एक चुलत बहिण असा परिवार आहे. बेंगाली या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरु होत्या.
१९८४ ते १९८६ या कालावधीत त्यांनी मुंबई विद्यापीठात ‘शिक्षणशास्त्र’ या विभागाच्या प्रमुख म्हणून तर १९८६ ते १९९२ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून काम पाहिले. डॉ. बेंगाली यांनी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण तर मानसशास्त्र विषयात ‘पीचएडी’ही मिळविली होती. बेंगाली यांनी २० हून अधिक विद्यार्थ्यांना एम.फील आणि ‘पीचएडी’साठी मार्गदर्शन केले होते. बेंगाली यांनी लिहिलेली काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
 मुंबई पारसी पंचायतच्या माजी विश्वस्त, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.