25 February 2021

News Flash

अतिवृष्टीमुळे मुंबई शहर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहर जिल्ह्यातील शाळांना आज (शनिवार) जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती सोपवल्यानंतरच शाळा सोडण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 2:25 pm

Web Title: due to heavy rains schools in mumbai city districts have declared holiday aau 85
Next Stories
1 पांडवकडा दुर्घटना: धबधब्यात वाहून गेलेल्या तिघींचे मृतदेह सापडले, एकीचा शोध सुरुच
2 बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सेवा बंद
3 हिंमत असेल तर ‘मिशन मंगल’ सिनेमा मराठीत डब करुन दाखवाच-मनसे
Just Now!
X