पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला असुन रेल्वे अर्धा तास उशीराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीवरून घराकडे परतणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. विरारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे उशीरांने धावत आहेत. काही वेळाच्या व्यत्ययानंतर रेल्वे सेवा हळू हळू सुरळीत होत आहे.