मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात खासगी वाहनाने जाणाऱ्यांना ई-पास मिळणे सुलभ व्हावे यासाठी त्याबाबतच्या संकेतस्थळावर विशेष सुविधा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. गणेशोत्सवात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही. पण खासगी वाहनाने जाणाऱ्यांसाठी ई-पास बंधनकारक आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर अर्ज करताना प्रवासाचे कारण म्हणून अत्यावश्यक सेवा, मृत्युविषयक प्रवास आणि गंभीर वैद्यकीय समस्या अशा तीनच गोष्टींचे पर्याय होते. त्यामुळे गणेशभक्तांना अर्ज करताना अडचण येत होती.  ती आता सोडविण्यात आली आहे.  इतर जिल्ह्य़ांतून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठीही ही प्रक्रिया सुलभ झाली आहे.