19 September 2020

News Flash

मुंडे असते, तर राजकारणातील चित्र वेगळे असते – खडसे

ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज हयात असते, तर राजकारणात वेगळे चित्र दिसले असते

ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे आज हयात असते, तर राजकारणात वेगळे चित्र दिसले असते, असे महसूलमंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसेंविरोधात आरोपसत्र सुरू असताना भाजपमध्ये एकाकी पडलेल्या खडसे यांना मुंडे यांची सध्या प्रकर्षांने आठवण होत आहे. मुंडे हे ओबीसी व बहुजन समाजाचे नेते होते. त्यांनी त्यांच्यासाठी मोठा संघर्ष केला आणि संघटनेचीही चांगली बांधणी केली. मुंडे हे अतिशय उमदे नेते होते, असे खडसे यांनी स्पष्ट केले. वादात अडकलेल्या खडसे यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी जाहीरपणे खडसे यांची फारशी पाठराखण केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:12 am

Web Title: eknath khadse gopinath munde
Next Stories
1 ‘कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ नाही’
2 शिक्षा पूर्ण होऊनही ‘बहुकाम्या’ असल्याने गजाआडच!
3 ‘नमो टी स्टॉल’बाबत भाजपची सारवासारव
Just Now!
X