बेस्ट उपक्रमातील १,७८२ कर्मचारी करोनाबाधित असून यातील ८० टक्के कर्मचाऱ्यांना अतिसौम्य, सौम्य लक्षणे आहेत, तर १५ टक्के कर्मचाऱ्यांना सौम्यपेक्षा थोडी जास्त लक्षणे आणि उर्वरित ५ टक्के म्हणजेच ८९ कर्मचाऱ्यांना गंभीर स्वरूपाची लक्षणे असून यातील २२ जणच करोनामुक्त झाले असल्याची माहिती बेस्ट उपक्र माने तयार के लेल्या अहवालातून समोर आली आहे.करोनाबाधित कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीआधारे बेस्ट उपक्रमाने अहवाल तयार केला आहे. बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बाधितांपैकी १,५६६ कर्मचारी बरे झाले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात आतापर्यंत २.५० लाखांपर्यंत करोना रुग्णांची नोंद असून यातील बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या पाहता प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगण्यात आले.