News Flash

सुशांत सिंह आत्महत्या : नोंदवण्यात आला चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांचा जबाब

राजीव मसंद यांना कालच पाठवण्यात आलं होतं समन्स

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येप्रकरणी आज राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना याप्रकरणी समन्स पाठवण्यात आले होते. आज राजीव मसंद यांचा जबाब या प्रकरणी नोंदवण्यात आला. वांद्रे पोलीस ठाण्यात राजीव मसंद आले होते. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळात अनेकांचे जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने सगळं बॉलिवूड हादरलं. मात्र काही दिवसातच सुशांत सिंह राजपूतचा बळी घराणेशाहीमुळे आणि गटबाजीमुळे गेला असेही आरोप सिनेसृष्टीतूनच झाले. अभिनेत्री कंगनाने या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली.

यानंतर या प्रकरणात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्साळी, शेखर कपूर यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता या प्रकरणात चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. यासाठी त्यांना काल समन्स पाठवण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 2:54 pm

Web Title: film critic rajeev masand arrives at bandra police station to record his statement in connection with actor sushant singh rajputs suicide case scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक तर अधिपरिचारिकांना दुसरा न्याय!
2 मुंबईतील तरुणाचा मुळशी पॅटर्न, २५ व्या वाढदिवशी तलवारीने २५ केक कापले; पोलिसांनी व्हिडीओ पाहिला आणि…
3 आणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Just Now!
X