* एआयआयबीकडून ३,५०० कोटींचे कर्ज मंजूर

* केंद्र सरकार, राज्य सरकार, एमआरव्हीसी आणि एआयआयबीत करार

पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण इत्यादी एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना ३ हजार ५०० कोटी रुपयांचे आर्थिक बळ मिळणार आहे.

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) कर्ज मंजूर केल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली. केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ, एआयआयबीत कर्ज पुरवठय़ासंदर्भात सोमवारी करार झाला.

हे कर्ज एकूण ३० वर्षांच्या कालावधीकरिता असेल. यामुळे प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले. एमयूटीपी-३ ला चालना मिळण्यासाठी राज्य सरकारचेही सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी जुलै महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान  सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली होती.

* एमयूटीपी-३ मधील प्रकल्प व खर्च (एकू ण खर्च- १० हजार ९४७ कोटी रु.)

* पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका- २,७८३ कोटी रु.

* ऐरोली ते कळवा दरम्यान उन्नत रेल्वे मार्ग- ४७६ कोटी रु.

* विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण -३,५७८ कोटी रु.

* ४७ वातानुकू लित लोकल- ३,४९१ कोटी रु.

* दोन स्थानकांतील रूळ ओलांडणाऱ्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना- ५५१ कोटी रु.

* तांत्रिक साहाय्य- ६९ कोटी रु.