२१व्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञानातील विकासाच्या जोरावर मानवाने प्रचंड प्रगती केली. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही निर्माण झाल्या. या समस्यांच्या गर्दीतही स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने कर्तृत्वाच्या जोरावर जगाच्या पातळीवर प्रत्येक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. अशाच स्त्रीशक्तीचा शोध ‘लोकसत्ता’ घेत आहे. येत्या नवरात्रोत्सवानिमित्त यंदाही ‘शोध नवदुर्गेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘अभ्युदय बॅंक’ हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

या उपक्रमासाठी नऊ ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार आहे. विधायक कार्य करत असताना नवी ओळख निर्माण करणाऱ्या अशा दुर्गाची माहिती आम्हाला हवी आहे. समाजातील ही ‘दुर्गा’ असेल तुमच्या आमच्यातलीच, परंतु धाडसी, नेहमीच्या चौकटीतील गोष्टींना टाळून नवे कार्य घडवणारी, समाजातल्या वंचितांना मायेची सावली देणारी, त्यासाठी कदाचित समाजाच्या, कुटुंबीयांच्याही विरोधात जाऊन विधायक उपक्रम राबविणारी. अशा दुर्गाची माहिती आपणही आमच्याकडे पाठवू शकता. ही माहिती ईमेलद्वारे किंवा आमच्या कार्यालयीन पत्त्यावर ३० सप्टेंबपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

आमचा पत्ता
लोकसत्ता शोध नवदुर्गेचा,
ईएल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा loksattanavdurga@gmail.com