26 January 2021

News Flash

विघ्नहर्त्या गणरायाचे वाजतगाजत आगमन ! मुंबई, पुण्यासह अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, गुरुवारी घरोघरी आणि प्रत्येक

गणपतीला दूर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जातं.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, गुरुवारी घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होतील. पुण्यातील श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होणार आहे. बुधवारी गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांची दिवसभर सर्वत्र सुरू होती. विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

पुण्यातील दगडूशेठ गणेशोत्सवात ध्वज आणि ढोल पथकांचा उत्साह

 

पुण्यातील दगडूशेठ गणपती…

पुणे: गणपती मिरवणुकीमधील महिला ढोल ताशा पथकाचा उत्साह

पुणे: दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीसाठी गणरायाची मुर्ती रथामध्ये ठेवण्यात आली तो क्षण

नागपूरमधील टेकडी गणेश

मुंबई: शीव येथील जीएसबी गणेश मंडळाच्या गणरायांच्या भक्तांच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर

कोईम्बतूरमध्येही भक्तांनी गणेश चतुर्थीनिमित्त मंदीराबाहेर मोठ्या रांगा लावून गणरायाचे दर्शन घेतले

मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी गर्दी

तेलंगणामधील गणेशोत्सवाचा उत्साह

 

गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त –
सुख, शांती,समृध्दी आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आज गुरूवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थी आगमन होत आहे. श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळी सहा वाजेपासून दुपारी १.३० ही सर्वोत्तम वेळ आहे. शिवाय १२.३० ते ३.३० ही अमृत वेळ आहे. पार्थिव गणेशपूजनाचे हे व्रत भाद्रपद चतुर्थीला करायचे असते. त्यामुळे सूर्योदयापासून मंगलमूर्तीची (साडेसहा) प्रतिष्ठापना करता येईल. दुपारी दीडपूर्वी माध्यान्ह आरती व नैवेद्य दाखवणे अपेक्षित असल्याने त्यापूर्वी प्रतिष्ठापनेचा विधी पूर्ण होणे आवश्यक असले तरी दिवसवर चतुर्थी असल्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पूजा करता येऊ शकते. दीड दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असतो त्यांनी ॠषीपंचमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी विसर्जन करावे. गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे पार्थिव पूजन कुळाचाराप्रमाणे करावे. देवाघराजवळ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी म्हणजे देवाच्या पूजेनंतर लगेच गणेश मूर्तीची पूजा करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 6:19 am

Web Title: ganesh chaturthi 2018 ganapati will be installed in the house today
Next Stories
1 वाहनचालकांना धमकावणारा फलक अखेर हटवला!
2 मूर्तिकार धोंडफळे घराण्याची चौथी पिढी कला क्षेत्रात
3 ग्रंथोत्तेजनासाठी अर्थोत्तेजन हवे!
Just Now!
X