शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पीडित छायाचित्रकार तरुणीने ओळखले आहे. बुधवारी डोंगरी येथील सुधारगृहात न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओळख परेडमध्ये तिने तात्काळ त्याला ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या मित्रानेही या आरोपीला ओळखले. या प्रकरणातले उर्वरित चार आरोपी पोलीस कोठडीत असून गुरुवारी कोठडीची मुदत संपणार आहे. आरोपींची ओळख परेड न्यायालयीन कोठडीत असतानाच होते. ओळख परेड लवकर व्हावी, यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार नसल्याचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले. ३१ जुलैच्या बलात्कार प्रकरणाचा तपासही मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.