30 September 2020

News Flash

गणेशोत्सव मंडळांसाठी ‘मुंबईचा राजा’ स्पर्धा

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१९’चा श्रीगणेशा; ५१,००१ रुपयांचे पारितोषिक; प्रवेशिका आज आणि उद्या उपलब्ध

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१९’चा श्रीगणेशा; ५१,००१ रुपयांचे पारितोषिक; प्रवेशिका आज आणि उद्या उपलब्ध

प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असून यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान मिळणार आहे. विजेत्या मंडळाला ५१,००१ रुपयांचे भव्य पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेच्या प्रवेशिका ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी भरून द्यायच्या आहेत. या स्पर्धेत कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई (शहर) या विभागांतील मंडळे सहभागी होऊ  शकतील.

पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाचे उपक्रम,  गणेशमूर्ती देखावा विषयांची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिक्षेपकाचा आवाज याचाही विचार करण्यात येणार आहे.

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा’ प्रायोजक

’ सहप्रायोजक : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), रिजन्सी ग्रुप

’ पॉवर्डबाय : इंडियन ऑईल. बँकिंग पार्टनर : अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

’ इकोफ्रेंडली पार्टनर : ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी)

प्रवेशिका येथे मिळतील

(वेळ- स. १०.३० ते सायं. ५.३०.)

’ मुंबई : लोकसत्ता, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- २१. संपर्क- धर्मेश म्हसकर – ९७७३१५४९२४.

’ ठाणे (पश्चिम) : लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे. संपर्क- मिलिंद दाभोळकर – ९१६७२२१२४६.

’ डोंबिवली (पूर्व) : सप्तशती ज्वेलर्स – मंदार न्यूज पेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, डोंबिवली. संपर्क- सुरेश ठाकूर – ९३२२९०६५०५, महेश ठोके – ९८३३६१०३७५.

’ कल्याण : संपर्क – रोहित पानसरे – ९८१९७६७१३३.

’ नवी मुंबई : अनंत वाकचौरे ९३२२९०६५०६, हर्षल खैरे – ९०८२९७४८८६.

बक्षिसांची लयलूट

’ स्पर्धेत एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे.

’ पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक.

’ विभागवार १५,००१ रु.चे विशेष पारितोषिक.

’ सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वैयक्तिक २,५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह असे विशेष पारितोषिक.

’ सहभागी मंडळांना सन्मानपत्र.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 3:08 am

Web Title: ganpati mandal competition mumbaicha raja loksatta 2019 akp 94
Next Stories
1 सांगलीत गणेश मूर्तीच्या निर्मितीलाही महापुराचा फटका
2 गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी
3 सगुण ते निर्गुण
Just Now!
X