परदेशी पर्यटकांचीही नाराजी

मुंबईच्या प्रसिद्ध गिरगाव चौपाटीला फिरण्याकरिता येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांना सध्या कुजलेल्या कचऱ्याच्या दरुगधीचा सामना करावा लागतो आहे. पावसाळी दिवस असल्याने खवळलेल्या समुद्रातून कचरा वारंवार किनाऱ्यांवर येत असला तरी तो तात्काळ हटवला न गेल्याने किनाऱ्यावरील दरुगधीत वाढ होत आहे. गिरगाव चौपाटीशेजारील ‘छोटी चौपाटी’ येथे सध्या समुद्रातून टनावारी कचरा वाहून आला असून नरिमन पॉइंटपासून ते या चौपाटीपर्यंत हा कचरा पसरला आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांकडून हा कचरा तात्काळ उचलण्याची मागणी होत असून येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
Plaster collapsed Seawoods
नवी मुंबई : पाण्याच्या टाकीचे प्लास्टर कोसळले, नव्या इमारतींच्या ब्लास्टिंगमुळे रहिवासी चिंतेत, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

मुंबई शहरातील बहुतांश किनारपट्टय़ांवर कचऱ्याच्या समस्येने भीषण रूप धारण केले असून पालिकेकडून मानवी व यांत्रिक बळाच्या मदतीने हा कचरा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रमुख चौपाटय़ा वगळता अन्य भागांत मनुष्यबळाच्या साहाय्याने कचरा हटवला जात असल्याने संपूर्ण कचरा काढण्याठी वेळ जातो. या रविवारी गिरगाव चौपाटीशेजारील ‘छोटी चौपाटी’ येथे समुद्रातून मोठय़ा प्रमाणात कचरा वाहून आला. हा कचरा मंगळवारी तसाच किनारपट्टीवर साचून राहिला होता. त्यामुळे सायंकाळी चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांना मुख्य गिरगाव चौपाटीवरच गर्दी करावी लागली. त्यामुळे चौपाटीवर मनसोक्त वावरण्याच्या उत्साहाला अनेकांना मुरड घालावी लागली. याबाबत सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे म्हणाले की, सध्या नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंत जवळपास दीड किलोमीटरहून अधिकच्या क्षेत्रात कचरा वाहून आला आहे. अंदाजे २० ते २५ टनांच्यावर हा कचरा असण्याची शक्यता आहे. मरिन ड्राइव्ह येथील टेट्रापॉडमध्येही हा कचरा साठून राहिला असून त्याचा मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना त्रास होत असल्याचे दिसून आले. पालिका गिरगाव मुख्य चौपाटीवर असा कचरा आल्यास मोठी यंत्रणा लावून हटवते, मात्र अन्य किनाऱ्यांवर कचरा आल्यास त्यासाठी मोठय़ा यंत्रणा का वापरत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पाच किलोमीटपर्यंत कचराच

मुंबईसभोवतालच्या खाडय़ा-नाले यातून सध्या मोठय़ा प्रमाणात कचरा समुद्रात वाहून चालला आहे. हा कचरा समुद्रात एका ठिकाणी साचून राहतो व वाऱ्याच्या दिशेप्रमाणे किनाऱ्यावर वाहून येतो. तसेच सागरी तळावर बसलेला कचरा समुद्र खवळल्यावरही उफाळून वर येतो.

त्यामुळे पावसाळी दिवसांमध्ये कचरा किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याचा लाभ घेऊन पालिकेने हा कचरा मोठी यंत्रणा लावून तात्काळ हटवणे अपेक्षित असतो. मात्र मुख्य चौपाटय़ा वगळता अन्य किनाऱ्यांवर मानवी बळाचा वापर करून कचरा हटवला जातो. यात वेळ गेल्याने किनारे दूषित होत आहेत, असेही पाताडे म्हणाले. सध्या मुंबईच्या किनारपट्टीपासून पाच किलोमीटर आतपर्यंत हा कचरा असून मासेमारीसाठी आत गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात माशांऐवजी कचराच येतो, असे वरळी कोळीवाडय़ातील विलास वरळीकर यांनी सांगितले. हा कचरा समुद्रातून किनाऱ्यावर आला आहे. तो हटवण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून दिवसभरात तीनही पाळ्यांमध्ये सुरू असून रात्रीदेखील आम्ही कचरा उचलत आहोत, असे पालिकेचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

गलिच्छ ठिकाणी फिरवू नका

गिरगाव चौपाटी, जुहू, एलिफंटा येथे आम्ही विदेशी पर्यटकांना नेतो, मात्र तेथे मोठय़ा प्रमाणात वाहून आलेला कचरा पाहून विदेशी पर्यटक आमच्यावरच वैतागतात. तसेच अशा गलिच्छ ठिकाणी फिरवण्यास आणत जाऊ नका, असेही दर्डावून सांगतात. त्यामुळे आम्ही विदेशी पर्यटकांना चौपाटय़ांवर पर्यटनासाठी नेणे टाळतो आहोत, असे मुंबईतील टुरिस्ट गाइड नंदिनी जोशी यांनी सांगितले.