News Flash

मेंढेगिरींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदी नेमण्यात आलेल्या हि.ता. मेंढेगिरी यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
निवृत्तीनंतर जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदी नेमलेल्या मेंढेगिरी यांनी सरकारला काही बाबींविषयी सल्ला दिला आहे. पण त्याकडे काणाडोळा करुन त्यांची कोंडी करण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. तो सरकारने मंजूर केला आहे का, याबाबत विचारता राजीनामा मिळालेला असून त्याबाबत निर्णय झालेला नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 12:02 am

Web Title: girish mahajan will discuss with devendra fadnavis about mendhegiri
टॅग : Girish Mahajan
Next Stories
1 जकात चुकवून मुंबईत येणारे १३७ कोटींचे दागिने पकडले
2 महाराष्ट्रातील केंद्रीय शाळांत मराठी बंधनकारक करणार – तावडे
3 आम्ही आग विझवणारे, उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य
Just Now!
X