करोना व्हायरसचा फटका यंदा सार्वजनिक गणेशोत्वाला बसणार असल्याची चिन्हं आहेत. मुंबईतील मोठ्या गणेशोत्व मंडळापैकी एक असेलेल्या वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ समितीने यंदाचा गणेशत्सोव भाद्रपदऐवजी फेब्रुवारी २०२१ मध्ये येणाऱ्या माघी गणेश जयंतीला करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वडाळ्यातील श्रीराम मंदिर येथील जीएसबी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

जीएसबी सार्वजनिक गणेश उत्सव समिती ट्रस्टचे सचिव मुकुंद कामात म्हणाले की, देशात सुरू असलेल्या करोनाच्या विळख्यापासून लवकर सुटका होईल असं वाटत नाही. गणेशत्सवात दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टसिंगचे नियम राखण्यासाठी, तेसच भाविकांच्या आरोग्याचा सुरक्षिततेसाठी माघ महिन्यात गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, वडाळा येथील जीएसबी गणेशउत्सोव मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रूपये दिले आहेत. याशिवाय एक लाख ५० हजार रुपये करोनाबाधितांचे बेड तयार करण्यासाठी दिले आहेत.