News Flash

उपनगरी रेल्वेवरील दगडफेकीत गार्ड जखमी

वाशी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

जखमी झालेले गार्ड राजेश यादव

वाशी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी ते मानखुर्द रेल्वे स्थानकदरम्यान अनोळखी व्यक्तीने शुक्रवारी सकाळी सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेवर दगडफेककेली. रेल्वेच्या मागच्या डब्यात असणारे रेल्वे गार्ड राजेश यादव दगड लागल्याने जखमी झाले. मानखुर्द रेल्वे स्थानकात प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी भायखळा रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उपनगरी रेल्वेवर दगडफेक होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी मानखुर्दजवळ उपनगरी रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. सकाळी ११.३९ च्या सुमारास बेलापूरहून सीएसएमटी जाणारी रेल्वे वाशी खाडी पुलाजवळ येताच अनोळखी व्यक्तीने गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. तो दगड रेल्वेमधील मागच्या डब्यात असणारे गार्ड राजेश यादव यांच्या डोक्याला लागला. दगड लागल्याने जखम होऊन डोक्यातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांनी तात्काळ ही माहिती मोटरमनला दिली. त्यानंतर गाडी मानखुर्द रेल्वे स्थानकात येताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्यावर स्थानकात असलेल्या प्रथमोपचार केंद्रात उपचार केले आणि पुढील उपचारासाठी भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात पाठवले.

आतापर्यंत रेल्वेवर झालेल्या दगडफेकीच्या घटना दादर ते भांडुप आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्ददरम्यान घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी रुळांजवळच असणाऱ्या पूल किंवा विद्युत खांबांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. नुकतेच एका दगड फेकणाऱ्याला अटक करण्यात आली असून तो कचरावेचक असल्याचे उघड झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 3:36 am

Web Title: guard hurt by pelting stone at a local train zws 70
Next Stories
1 गौतम नवलखा यांच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय राखून ठेवला
2 पुलांची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने
3 रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी ब्लॉक
Just Now!
X