यंदा मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करदात्यांना प्राप्तिकराच्या रचनेचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. दोन्हीपकी अधिकाधिक कर वाचवणाराच पर्याय लोकांकडून निवडला जाईल. अर्थात पशाविषयक आणि गुंतवणुकीच्या धोरणाची आखणीही यातून नव्याने करावी लागेल. याबाबत तपशीलवार माहिती असणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षकिांकाचे प्रकाशन मंगळवारी होत असून, त्यानिमित्ताने तज्ज्ञांकडून गुंतवणुकीबाबत मार्गदर्शनही होणार आहे.

देशाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा पट मांडून गुंतवणुकीच्या अवकाशाचा धांडोळा असलेला ‘लोकसत्ता अर्थब्रह्म २०२०-२१’ या वार्षकिांक प्रकाशनाचे हे यंदाचे सातवे वर्ष आहे. त्यानिमित्त आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम, २५ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे होत आहे. विजया ग्रुप आणि फाइव्हब्रिक रिअ‍ॅल्टी प्रा. लि. या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर, तर अपना सहकारी बँक लि. बँकिंग पार्टनर आहेत.

कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर परिणाम करणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा पलू उलगडून दाखविणारे आणि अशा स्थितीत गुंतवणूक कशी आणि कुठे करावी, याचा नेमका मार्ग आणि पर्याय यांचे तज्ज्ञांद्वारे दिशादर्शन यानिमित्त होईल. ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वािळबे हे ‘समभागातील गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण’, सनदी लेखापाल आणि ‘सेबी’ मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे या ‘गुंतवणुकीतून कुटुंबाचे आर्थिक आणि कर नियोजन’, तसेच वस्तू-बाजाराचे विश्लेषक श्रीकांत कुवळेकर हे ‘गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापना’च्या पर्यायांचा यानिमित्ताने ऊहापोह करतील.

या कार्यक्रमासाठी सर्वाना प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे. मात्र, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाईल. उपस्थितांना आपले प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारून त्यांचे निराकरण करता येईल.

* कधी? : मंगळवार, २५ फेब्रुवारी, सायंकाळी ६.००

* कुठे? : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर

* मार्गदर्शक : समभाग गुंतवणुकीतून संपत्ती निर्मिती – अजय वाळिंबे

* गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापन – श्रीकांत कुवळेकर

* कुटुंबाचे आर्थिक आणि कर नियोजन- तृप्ती राणे