शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी रात्री नाट्यमयरित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हाजी अराफात शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महामंडळ नियुक्त्यांमध्ये शेख यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती, मात्र ती शिवसेनेकडून नाही तर भाजप कडून होती अशी माहिती आता समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेख यांची आयोगाच्या उपाध्यक्ष पदासाठी पक्षात उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग सुरु होती. पण नागपूरचे जगन्नाथ अभ्यंकर यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली. त्यातच शेख यांची भाजपाकडून आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आणि त्यानंतर प्रवेशाचा नाट्यमय सोहळा झाला.

after month BJP and NCP active in campaigning in Maval Ajit Pawar and Parth Pawars attention on every development
पिंपरी : अखेर महिनाभरानंतर मावळमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात सक्रिय; प्रत्येक घडामोडीवर अजित पवार, पार्थ पवारांचे लक्ष
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

मध्यंतरी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत वाद झाल्यानंतर शेख शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. हाजी अराफात शेख हे पूर्वी मनसेत होते. त्यानंतर ते शिवसेनेत आले होते आणि आता त्यांनी अखेर शिवसेनेलाही जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे.