लोकल ट्रेन बंद पडल्यामुळे शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी चुनाभट्टी रेल्वेस्थानकाजवळ सीएसटीकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला . त्यामुळे सध्या हार्बरवरील सीएसटीकडून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. तसेच सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या ट्रेनही १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे सकाळच्या ऐन धावपळीच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गेल्या तासभरापासून ही वाहतूक विस्कळीत असल्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना सध्या मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे आता मध्य रेल्वेमार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, ही वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागेल याबद्दलची कोणतीही निश्चित माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2015 रोजी प्रकाशित
चुनाभट्टीजवळ लोकल ट्रेन बंद पडल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत
लोकल ट्रेन बंद पडल्यामुळे शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Written by रोहित धामणस्कर
Updated:

First published on: 04-09-2015 at 09:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour railway line disturbed due to local train stuck at chunabhatti