हार्बर रेल्वेवर बुधवारी सकाळी मानखुर्द स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले.

मानखुर्द स्थानकाजवळ बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला. रेल्वेचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून दुरुस्तीचे काम सुरु देखील झाले आहे. मात्र, यामुळे मानखुर्द – पनवेल या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका पनवेलकडून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांनाही बसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्याही रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.