28 February 2020

News Flash

बेस्टकडून सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा

पासधारक, ई-पर्स खातेधारक, वीजग्राहकांना लाभ

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पासधारक, ई-पर्स खातेधारक, वीजग्राहकांना लाभ

गेल्या दहा वर्षांमध्ये बेस्टच्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने आता तोटय़ात चाललेल्या परिवहन विभागाला सावरण्यासाठी बेस्टने प्रवाशी आणि वीजग्राहकांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा देण्याची योजना सुरू केली आहे. ‘बेस्ट आमची, काळजी घेते’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय चाचण्यांमध्ये सूट देण्यात येणार आहे. बेस्टचे पासधारक, ई-पर्स खातेधारक आणि वीजग्राहक यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत मोफत नेत्रतपासणी, वैद्यकीय सल्ला, रुग्णालयाच्या बिलावर २० टक्के सूट, आरोग्य तपासण्यांमध्ये ५० टक्के सवलत आदी वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबई आणि ठाण्याच्या चार खासगी रुग्णालयांमध्ये या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. बेस्टने या रुग्णालयांशी सामंजस्य करार केला असून सीएसआरअंतर्गत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या रुग्णालयांमध्ये बेस्टचा पास, १०० रुपये जमा असलेले ई-पर्स खाते आणि गेल्या महिन्याचे भरलेले देयक (बिल) दाखवून मुंबईकरांना या आरोग्य सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

बेस्टच्या प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने ही योजना आणण्यात आली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवासी बेस्टशी जोडले जातील. मुंबईतील अजून काही रुग्णालयांनी पुढाकार घेऊन बेस्टच्या या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफाणे यांनी केले आहे.

रुग्णालये कोणती?

  • क्रिटीकेअर रुग्णालय (अंधेरी पूर्व व पश्चिम), बालाजी रुग्णालय (भायखळा), वासन आय केअर (बोरिवली, ठाणे, मुलुंड, डोंबिवली आणि वाशी)

प्रवाशांची घटती संख्या

  • २००५-२०१५ या दहा वर्षांच्या कालावधीत दिवसाला प्रवास करणाऱ्या सरासरी प्रवाशांची संख्या ही ४१ कोटी ३७ हजार ६४१ वरून घसरत २८ लाख ९९ हजार १३६ वर आली आहे.
  • ही घट लक्षात घेऊन बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्या नियमित ग्राहकांना आता मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय चाचण्यांमध्ये सूट यांसारख्या वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य तपासणी योजनेत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

First Published on May 6, 2017 2:26 am

Web Title: healthcare in discounted rates from best
Next Stories
1 ५० मिनी वातानुकुलित बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यात
2 मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल
3 राजकारण्यांच्या अर्थकारणात अर्थसंकल्प रखडला
Just Now!
X