News Flash

हरभजन सिंग कमला मिल अग्निकांडातील आरोपीच्या भेटीला?

हरभजनने माध्यमांना प्रतिक्रिया देणेही टाळले.

हरभजन सिंग कमला मिल अग्निकांडातील आरोपीच्या भेटीला?
संग्रहित छायाचित्र

कमला मिल आगीप्रकरणी अटक झालेल्या विशाल कारियाची भेट घेण्यासाठी क्रिकेटपटू हरभजन सिंग मुंबईत आला होता. मात्र, कारियाच्या घराबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून हरभजन विशालची भेट न घेताच माघारी परतला, असे समजते.

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस ब्रिस्टो या पबमध्ये २९ डिसेंबर रोजी आग लागली होती. या आगीप्रकरणी दोन्ही पबच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील ‘वन अबव्ह’ मालकांना आश्रय दिल्याप्रकरणी विशाल कारियाला अटक करण्यात आली होती. सोमवारी न्यायालयाने विशाल कारियाला जामीन मंजूर केला होता.

जामिनावर बाहेर आलेल्या विशाल कारियाची भेट घेण्यासाठी हरभजन सिंग गुरुवारी मुंबईत आला. रात्री हरभजन विशाल कारियाच्या जुहू येथील निवासस्थानापर्यंत पोहोचला. मात्र, इमारतीखाली माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून हरभजन तिथून निघून घेतला. विशालची भेट न घेताच हरभजनला माघारी परतावे लागले. कारमध्ये हरभजन दिसताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हरभजनने तिथून निघून जाणे पसंत केले.

विशालचे क्रिकेट कनेक्शन
विशाल हॉटेल व्यावसायिक असला तरी भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक बड्या खेळाडूंचा तो मित्र आहे. यापैकी हरभजन सिंग हा त्याचा अत्यंत जवळचा मित्र आहे. हरभजन मुंबईत आल्यावर विशालच्या घरीच वास्तव्यास असतो. हरभजनच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यात विशालची उपस्थिती असते. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य राहाणे यांच्यासोबत विशालची अनेक छायाचित्रे समोर आली होती. महत्त्वाची मालिका किंवा आयपीएलच्या हंगामात प्रत्येक सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये नाणेफेकीपासूनची व्यूहरचना ते अन्य बारकसारीक माहिती या क्रिकेटपटूंकडून मिळवून बुकींना पुरवण्याचे कामही विशाल करतो, असा संशय आहे. बुकींचा खबरी म्हणूनही त्याला ओळखले जाते.

विशालवर कमला मिलप्रकरणी कारवाई का?
कमला मिल आगीनंतर ‘वन अबव्ह’चा मालक अभिजीत मानकर याची कार विशालकडून हस्तगत करण्यात आली. आगीनंतर संघवीबंधूंनी अभिजीत मानकरची मोटारगाडी विशालकडे दडवली. त्यानंतर मानकर, संघवी बंधू पसार झाले. मधल्या काळात मानकरची मोटारगाडी विशालने वापरली. या तिघांना पळून जाण्यात मदत करण्यासाठी तसेच त्यांना नवा सिम कार्ड आणि मोबाईल मिळवून देण्यात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी विशालला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 10:42 am

Web Title: indian cricketer harbhajan singh came mumbai to meet kamala mill compound fire accused vishal karia
Next Stories
1 लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत आग; १ जखमी
2 वरळी कोळीवाडा झोपडपट्टीच!
3 ‘रिकाम्या’ तेजसला जादा थांबे?
Just Now!
X