News Flash

जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांची तावडेंच्या निवासस्थानी घोषणाबाजी

बाबासाहेब पुरंदरेंना दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार रद्द करण्याची मागणी करत बुधवारी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसल्या.

| August 19, 2015 02:46 am

बाबासाहेब पुरंदरेंना दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करण्याची मागणी करत  जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सांस्कृतिक मंत्री  विनोद तावडे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या १५ ते २० महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वत:ला तावडे यांच्या बंगल्यात कोंडून घेतले. मरिन लाईन्स पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.  दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. बाबासाहेबांचं आजपर्यंतचे कार्य मोठं असून त्याबाबत प्रश्न उपस्थित करता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले. तसेच याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना  दहा हजारांचा दंडदेखील ठोठावण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 2:46 am

Web Title: jijau brigade volunteers protest against maharashtra bhushan award
Next Stories
1 वादावर पडदा टाका!
2 ‘क्रिकेट अकादमी’ऐवजी आलिशान क्लब!
3 भालचंद्र नेमाडे साहित्यक्षेत्रातील दहशतवादी
Just Now!
X