युवकांना संघटीत करण्यासाठी संघटनाचा पुढाकार; चर्चासत्रांचे आणि मेळाव्यांचे आयोजन

मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील कुणबी संघटनांनीही एकत्र येऊन मोच्रेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कुणबी युवकांना संघटीत करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे, चर्चसत्रांचे आणि मेळाव्याचे आयोजन सध्या मुंबईत कुणबी संघटनांतर्फे करण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या मराठय़ांच्या दुचाकी रॅलीनंतर आता मुंबई जिल्हा पातळीवरील कुणबी संघटनांनी मुंबईतील कुणबी समाजबांधवांना आणि मुख्यत युवकांना एकटविण्यासाठी कंबर कसलेली दिसते. त्यामुळेच कुणबी समाजोन्नती संघाशी संलग्न असणाऱ्या कुणबी युवा मंडळाने युवकांची मोट बांधण्यासाठी जिल्हा पातळीवर अनके चर्चासत्रांचे आणि मेळाव्याचे आयोजन केले आहे.

कुणबी युवा मंडळाचे शिक्षण, आरोग्य, रोजगार असे विभाग यासाठी काम करत असून त्यांच्यामार्फत चेंबूर, ट्रॉम्बे, काळाचौकी, कुर्ला आदी विभागांमध्ये अनेक चर्चसत्रांचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकतेच ‘कुणबी-ओबीसी आरक्षण माहिती शिबीर’ या विषयांतर्गत काळाचौकी आणि चेंबूर येथे चच्रेचे आयोजन करण्यात आले. याच दिवशी खामगाव-बुलढाणा येथे महाराष्ट्र कुणबी स्नेहसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. या शिवाय २० नोव्हेंबरला षन्मुखानंद सभागृहात नवी मुंबईचे उप महापौर अविनाश लाड यांनी ‘जागर कुणबी समाजाचा’ या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये कुणबी समाजापुढे असणारे आरक्षण, राजकारण आणि एकजुटीचे विषय चर्चिले जाणार आहेत. या आधी झालेल्या ‘मराठा आरक्षण – समज, गरसमज’ चर्चासत्रात ‘ओबीसी संघर्ष समन्वय समिती’ने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली होती.

मराठय़ांना स्वतंत्र आरक्षण नको

नुकत्याच झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमामध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी मराठय़ांना स्वतंत्र आरक्षण मिळता कामा नये अशी भूमिका घेतली. शिवाय मराठा हा कुणबी नाही आणि मराठय़ांना कुणब्यांमध्ये आरक्षण नको अशीही भूमिका त्यांनी मांडली. याविषयी ‘लोकसत्ता-मुंबईशी’ सविस्तर बोलताना बावकरांनी सांगितले की ‘आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक आणि आíथक निकषावर दिले जाते. मराठा समाज सामाजिकद्ृष्टय़ा मागासलेला नसून तो प्रगत आहे. १९३१साली ब्रिटिशांनी केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणात त्यांची स्वातंत्र जात नोंद केली आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण दिल्यास ते घटनाबाह्य़ ठरेल, अशा शब्दांत त्यांनी आरक्षणाला विरोध केला.