कुर्ला ते परळ दरम्यान रेल्वेचा पाचवा आणि सहावा मार्ग तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांमध्ये या प्रकल्पाचा अंतर्भाव असून त्यासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते परळ या मार्गावरही पाचवा-सहावा मार्ग टाकण्यात येणार असला तरी कुर्ला ते परळ या टप्प्यातील मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. या टप्प्यातील मार्गासाठी जमीन उपलब्ध असून परळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान जमीन उपलब्ध नसल्याने ती खासगी व्यक्ती अथवा संस्थांकडून अथवा सरकारकडून हस्तांतरित करावी लागणार आहे.