‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेचा आज शेवटचा दिवस
ऐन दिवाळीत खरेदीचा फीव्हर जोरात असताना सोने खरेदीलाही उधाण आले आहे. सोने खरेदीबरोबरच बक्षिसाचा आनंद देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेलाही ग्राहकाकंडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या योजनेंतर्गत मंगळवारी ‘नांदा सौख्य भरे’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेची लाडकी ‘स्वानंदी’ अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने भेट दिली. मालिकेत सरळसाध्या स्वभावाची, तत्त्वनिष्ठ स्वानंदीची भूमिका रंगवणाऱ्या ऋतुजाने तितक्याच मनमोकळेपणे या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेतील ज्वेलर्सना भेटी दिल्या.

या योजनेंतर्गत ‘लोकसत्ता’ने प्रस्तावित केलेल्या ज्वेलर्समधून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तितक्याच मोठय़ा बक्षिसाचा आनंदही मिळवून देणाऱ्या योजनेचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. या योजनेत सहभागी असलेल्या प्रभादेवी येथील ‘चिंतामणी ज्वेलर्स’ आणि वरळीतील ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’ येथे ऋतुजाने भेट दिली. ‘चिंतामणी ज्वेलर्स’च्या वैजयंती कायगांवकर यांनी ऋतुजाचे मनापासून स्वागत केले. मालिकेतील स्वानंदीला भलेही दागिन्यांनी नटण्यामुरडण्याची हौस नाही. मात्र, तिथेही तिच्या लग्नाची धूमधाम सुरू असल्याने साहजिकच तिच्यासाठी दागिन्यांची खरेदीही झाली आहे. पारंपरिक दागिन्यांचे महत्त्व आणि नव्या धाटणीचेही नाजूक नक्षीकाम असलेल्या दागिन्यांचा मोहकपणा ऋतुजालाही निश्चितच भावला असावा. ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’च्या चिंतन जैन यांनीही ऋतुजाचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन जोरदार स्वागत केले.

‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेचा आजचा शेवटचा दिवस असून या योजनेत सहभागी असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानांतून ग्राहकांनी तीन हजार रुपयांपर्यंत व त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने व दागिने खरेदी करायचे आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या दागिन्यांवर दुकानातून ग्राहकांना ‘लकी कूपन’ दिले जाणार असून कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकायचे आहे. या योजनेच्या शेवटच्या दिवशी सहभागी दुकानांमधून सर्व कूपन्स एकत्रित केली जातील. सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विजेत्यांना कार, परदेशी सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही योजना पॉवर्डबाय गुणाजी एंटरप्राईजेस, प्लॅटिनम पार्टनर, लागू बंधू, वामन हरी पेठे सन्स, गोल्ड पार्टनर, वामन हरी पेठे ज्वेलर्स, सेन्को गोल्ड अँड डायमंड, सिल्व्हर चिंतामणीज फाईन ज्वेलर्स, श्री नेमिनाथ ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, ट्रॅव्हल पार्टनर आत्माराम परब संचालित ईशा टूर, बँकिंग पार्टनर डीएनएस बँक यांचे सहकार्य लाभले आहे.