सततच्या भारनियमनाने त्रस्त असलेल्या राज्यातील जनतेला दिवाळीचे पाच दिवस तरी भारनियमनमुक्तीचा ‘बोनस’ मिळणार आहे. शुक्रवारपासून पाच दिवस राज्यात सर्वदूर विजेचा लखलखाट असेल.  त्यासाठी केंद्रीय कोटा आणि कोयनातून गरजेनुसार ५०० मेगावॉट विजेची तरतूद करण्यात येणार आहे.
राज्य भारनियमनमुक्त जाहीर झाले असले तरी वीजचोरी आणि अल्प वसुलीच्या निकषामुळे राज्याच्या १७ टक्के भागात अद्यापही भारनियमन सुरू आहे. त्यातही वीजचोऱ्यांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे जालना, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव अशा सात जिल्ह्य़ांतील सुमारे ७५ टक्के भाग भारनियमनामुळे अंधारात आहे. राज्यातील १३०० फीडरवर एक ते पाच नोव्हेंबर या दिवाळीच्या पाचही दिवशी राज्यातील भारनियमन रद्द करण्यात आले आहे.