येत्या रविवारी ८ डिसेंबरला मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नसेल. मात्र, मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, पनवेल या दरम्यान दोन्ही दिशेकडील व पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीम दरम्यान जलद मार्गावर दुरुस्तीचे काम चालेल.

पश्चिम रेल्वे

* कुठे : सांताक्रुझ ते माहीम अप, डाऊन जलद मार्ग

* कधी : स. १०.३५ ते दु. ३.३५

* परिणाम : या दरम्यान जलद मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही गाडय़ा रद्द करण्यात येतील. वांद्रे लोकल आणि खार रोड दरम्यानचे गेट बंद राहील.

ट्रान्स हार्बर मार्ग 

* कुठे : ठाणे ते वाशी, पनवेल</p>

* कधी : स. ११.१० ते दु. ३.५० पर्यंत ठाणे ते वाशी, नेरुळ अप आणि डाऊन मार्ग, स. १०.३५ ते दु. ४.०७ पर्यंत ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन मार्ग, स. १०.४५ ते दु. ३.३८ पनवेल, बेलापूर, वाशी ते ठाणे अप मार्ग

परिणाम : ब्लॉक काळात ठाणे ते वाशी, बेलापूर, नेरुळ, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.