• राज्यातील टाळेबंदीत १ जूनपर्यंत वाढ
  • मालवाहतूकदारही हवालदिल…
  • धान्य, भाजीपाला पुरवठ्यावर परिणामाची भीती

 

मुंबई : करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लागू असलेले कठोर निर्बंध १ जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. याबाबतच्या आदेशातील नव्या नियमांमुळे मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता असून, निर्बंधांना मुदतवाढ दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

राज्यात १४ एप्रिलपासून लागू असलेले कठोर निर्बंध आणखी १५ दिवसांनी वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने आदेश काढला आहे. कठोर निर्बंधांमुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे ते वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट

के ले. सध्या लागू असलेले निर्बंध १ जूनच्या सकाळी ७ पर्यंत कायम राहतील, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महिनाभर लागू असलेले निर्बंध आणखी दोन आठवडे लागू राहणार आहेत. व्यापारी, असंघटित कामगार, छोटे दुकानदार आदींना व्यवहार बंद असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळेच आणखी किती काळ टाळेबंदी ठेवणार, असा संतप्त सवाल व्यापारी वर्गाकडून के ला जात आहे. दादरमधील काही व्यापाऱ्यांनी निर्बंधवाढीमुळे संताप व्यक्त केला.

सध्या काही विशिष्ट राज्यांतून येणाऱ्यांना करोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक होते. नव्या आदेशानुसार परराज्यांतून येणाऱ्यांना ४८ तासांपूर्वीचा करोना नसल्याचा अहवाल (आरटीपीसीआर) सादर करणे बंधनकारक करण्यात आले. नव्या निर्बंधांचा मोठा फटका मालवाहतुकीला बसेल. ट्रकचालक आठवडा-आठवडा प्रवास करतात. चाचणी के ल्यानंतर तत्काळ अहवालही मिळत नाही. यामुळे राज्याच्या सीमेवर मालवाहने अडवल्यावर चालक करोना नसल्याचा अहवाल सादर कसे करणार, असा सवाल वाहतूकदारांच्या संघटनेने उपस्थित के ला.

धान्य, डाळी, अन्य जीवनाश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर परराज्यातून येतात. महाराष्ट्राने निर्बंध लागू के ल्यास शेजारील राज्येही त्याचे अनुकरण करतील. त्याचा मोठा फटका कोकणातील आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त के ली जाते. सध्या कोकणातील आंबा राज्याबाहेर मोठ्या प्रमाणावर जात आहे. राज्याच्या सीमेवर वाहनचालकांकडे करोना चाचणीचा अहवाल सक्तीचा के ल्यास पुढील दोन आठवडे राज्यात मालवाहतूक होण्याची शक्यता कमी आहे, अशी भीती वाहतूकदारांच्या संघटनेने के ली. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर लोकांची ने-आण के ली जात असल्याचे निदर्शनास आल्याने फक्त चालक व वाहक या दोघांनाच आता परवानगी देण्यात आली आहे.

भाजीपाल्यावरही परिणाम?

कृषी उत्पन्न बाजार समित्या, आठवडी बाजार किं वा ग्रामीण भागातील बाजारपेठांमधून करोनाचा संसर्ग होत असल्यास या बाजारपेठा बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. त्यातून भाजीपाला, फळे आदींच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद के ल्यास मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला, फळांची आवक होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते हे पुणे, नाशिक, नवी मुंबईसह अन्यत्र बघायला मिळाले. तेथे संसर्ग वाढतो. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात किं वा शहरातील काही विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याची मुभाही स्थानिक पातळीवर देण्यात आली आहे. मात्र, असे निर्बंध लागू करण्यापूर्वी त्याची ४८ तास पूर्वकल्पना नागरिकांना द्यावी लागेल. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सारे व्यवहार बंद के ले जातात. त्याची आदल्या दिवशी घोषणा के ली जाते आणि मग खरेदीसाठी झुंबड उडते. दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व निर्बंधमुक्त करण्यात आले आहे.

वाहतुकीत अडचणी

सर्वसामान्यांना  रेल्वे प्रवासास मनाईच अत्यावश्यक सेवा, आरोग्य किं वा सरकारी कर्मचारी वगळता कोणालाही मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा नाही. ही बंदी १ जूनपर्यंत कायम असेल. फक्त विमान कं पन्या, विमानतळ कर्मचारी तसेच बंदरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासास नव्याने परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त अन्य कोणालाही रेल्वे प्रवासास परवानगी नसेल.

दुकाने सकाळी  ११ पर्यंतच खुली

जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला, अंडी, कोंबड्या,  मटण आदी दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहतील. दुकानांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केशकर्तनालये, मॉल्स, उद्याने सारे बंदच राहणार आहे.

राज्यात करोनाचे ४२,५८२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ४२,५८२ रुग्ण आढळले असून, ८५० रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच वेळी दिवसभरात ५४ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील करोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. मुंबईमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने घटत असून, गुरुवारी रुग्णवाढ दोन हजारांखाली नोंदवण्यात आली. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १,९४६ रुग्ण आढळले, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात गुरुवारी २,०३७ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ३८ हजार ६४९ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.