प्रवेशिका मिळवण्याचा आज अंतिम दिवस

‘मुंबईचा राजा’ हा मान मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’त सहभागी होण्यासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून यंदा हा मान पटकावण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ५१,००१ रुपयांचे पारितोषिक मिळवून देणाऱ्या या स्पर्धेतील सहभागासाठी प्रवेशिका मिळवण्याची आज शेवटची संधी आहे.

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१७’ या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा सन्मान आणि ५१,००१ रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘अ‍ॅलेन आयूर’ असलेल्या या स्पर्धेच्या प्रवेशिका १९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असून २१-२२ ऑगस्टपर्यंत त्या सादर करायच्या आहेत. या स्पर्धेत कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई (शहर) या विभागातील मंडळे सहभागी होऊ  शकतील.

पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले उपक्रम, सामाजिक काम, गणेश मूर्ती देखावा, विषयांची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, मंडळाकडून ठेवली जाणारी स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिवर्धकाचा आवाज याचाही विचार केला जाईल.

या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार असून सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी वैयक्तिक २,५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.

प्रवेशिकांसाठी संपर्क

  • मुंबई- लोकसत्ता, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट- धर्मेश म्हसकर (९७७३१५४९२४).
  • ठाणे (पश्चिम)- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा- मिलिंद दाभोळकर (९१६७२२१२४६).
  • डोंबिवली (पूर्व)- सप्तशती ज्वेलर्स, मंदार न्यूजपेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, सुरेश ठाकूर (८४२४०४६५०५).
  • नवी मुंबई- अनंत वाकचौरे (९३२२९०६५०६), प्रवीण जाधव- (८०८०२९७७४०)
  • वेळ- स. १०.३० ते ५.३०
  • प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध