‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पध्रे’चे आयोजन; ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाचे आगमन ५ सप्टेंबर रोजी होत असून त्या निमित्ताने यंदाही ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पध्रेत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा सन्मान आणि ५१ हजार एक रुपयांचे मोठे पारितोषिक  दिला जाणार आहे. स्पध्रेच्या प्रवेशिका २८ ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार आहेत, तर प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे.

स्पध्रेचे सहप्रायोजक ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ (एलआयसी) आणि बेडेकर मसाले, बॅकिंग पार्टनर ‘डीएनएस बॅंक’ आहेत. ही स्पर्धा कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई या विभागातील मंडळे स्पध्रेत सहभागी होऊ शकतील. स्पध्रेत एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५ हजार एक रुपयांचे विशेष पारितोषिक आहे.

प्रत्येक विभागासाठी १५ हजार एक रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार असून सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वैयक्तिक दोन हजार ५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.

पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले उपक्रम, सामाजिक काम, गणेशमूर्ती देखावा, विषयाची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिवर्धकाचा आवाज याचाही विचार केला जाणार आहे.

प्रवेशिका मिळण्याचे, सादर करण्याची ठिकाणे

  • मुंबई : लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट- धम्रेश म्हसकर (९७७३१५४९२४).
  • ठाणे : लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा- अविश कदम (९८२०२०२९६६), मिलिंद दाभोळकर (९१६७२२१२४६),
  • डोंबिवली : सप्तशती ज्वेलर्स, मंदार न्यूजपेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, सुरेश ठाकूर (८४२४०४६५०५).
  • कल्याण : बुधकर पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड, भूपेंद्र, ६/१ पहिला मजला, महालक्ष्मी हॉटेलच्या वर, शिवाजी पथ- रोहित पानसरे (९८१९७६७१३३).
  • नवी मुंबई : अनंत वाकचौरे (९३२२९०६५०६), शशिकांत पाल (८९७६०४९१६३).

(वेळ – सकाळी १०.३० ते ५.३० प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध)