आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यसााठी राज्य सरकारने धावपळ सुरू केली आहे. त्यानुसार या प्रकल्पाला गती देण्यासाठी १० ऑक्टोबरला मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची पूर्तता करण्यात येत आहे. स्मारकाच्या जागेचा पर्यावरणीय अभ्यास करण्यासाठी निरी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून आठ महिन्यात  त्यांचा अहवाल येईल. तोवर या स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर इरादापत्रे मागविण्यात आले आहेत. त्यातील सर्वात चांगला आराखडा निवडणून त्यानंतर  अंतिम आराखडा बनविण्याचे काम देण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”