पुनर्बाधणी, नूतनीकरणाचा महामंडळाचा प्रस्ताव; प्रवासी भाडय़ात एक रुपया वाढ
एसटी म्हटले की लाल डबा आणि ओबडधोबड अस्वच्छ आगाराचे सर्वसामान्य चित्र नजरेसमोर रेंगाळत असते. मात्र, येत्या काळात एसटीच्या याच प्रतिमेला छेद देण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. एसटीच्या आगारांना अधिक शोभिवंत आणि स्थानकांना आकर्षक बनवण्यासाठी वास्तुविशारदाची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, परिवहन महामंडळाने प्रवासी भाडय़ात एक रूपयाने वाढ केली आहे.
खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने आगारांची पुनर्बाधणी आणि नूतनीकरण करून एसटीचे रूपडे बदण्यासाठी लवकरच वास्तुविद्याविशारदाची समिती नेमण्यात येणार असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.
सध्या राज्यभरात एसटीची एकूण ५८८ बस स्थानके तर २५२ बस आगार आहेत. यातून रोज १८ हजारांहून अधिक बसगाडय़ा सोडण्यात येत असून या गाडय़ांनी सुमारे ६८ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र इतकी मोठी संख्या असूनही एसटीच्या जुनाट आगार आणि स्थानकांमुळे एसटीची प्रतिमा मलिन होते, यासाठी वास्तुविशारदाच्या कौशल्याचा वापर करून एसटीला नवीन ओळख देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात प्रवासी सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे एसटी अपघातातील जखमींच्या उपचारासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना भरीव मदतनिधी उभारण्यासाठी परिवहन महामंडळाने एक रूपया भाडेवाढ केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अलीकडेच विधीमंडळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजनेची घोषणा केली होती.
अपघातग्रस्तांच्या सहाय्यतेसाठी निधी उभारण्याकरिता प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर एक रूपया अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

* महामंडळातील आगारांची ‘अ’ आणि ‘ब’ या दोन वर्गात विभागणी केली जाणार आहे.
* एक कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या कामांसाठी दोन टक्के तर एक कोटीपर्यंतच्या कामासाठी २.४ टक्के दराने वास्तुविद्याविशारदांना व्यवसाय शुल्क देण्यात येणार आहे.
* या कामासाठी संचालक मंडळाने नुकतीच मान्यता दिली असल्याचे समजते.

Residents of Santacruz and Khar, Residents of Santacruz and Khar Oppose bmc's Elevated Route, BMC Administration to Study Citizens Instructions, Santacruz, Khar, khar subway, Santacruz news, khar news, Santacruz Khar Elevated Route,
खार सब वेवरील उन्नत मार्ग प्रकल्प रद्द होणार ? नागरिकांच्या सूचनांचा प्रशासन अभ्यास करणार
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!