07 April 2020

News Flash

मागोवा २०१४

सरते वर्ष अनेक अर्थानी घडामोडींचे ठरले. निवडणुकांमुळे राजकारणाच्या आघाडीवर बरेच काही घडले. याशिवाय सामाजिक, आर्थिक, क्रीडा, कला क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही बऱ्याच घडामोडी घडल्या

| December 31, 2014 11:54 am

सरते वर्ष अनेक अर्थानी घडामोडींचे ठरले. निवडणुकांमुळे राजकारणाच्या आघाडीवर बरेच काही घडले. याशिवाय सामाजिक, आर्थिक, क्रीडा, कला क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही बऱ्याच घडामोडी घडल्या. या सगळ्याचा मागोवा घेणारे वर्षवेध लवकरच वाचकांच्या भेटीला. 

 

0001
* तब्बल ८२१ वर्षांनंतर नालंदा येथील विद्यापीठ पुन्हा एकदा सुरू (१.९.२०१४), कुलपती म्हणून डॉ. गोपा सबरवाल यांची नियुक्ती, मूळ नालंदा विद्यापीठाचे अवशेष असलेल्या जागेपासून १० किलोमीटर अंतरावर नवीन वास्तूवर हे विद्यापीठ सुरू
* देशातील २९ वे राज्य म्हणून तेलंगण राज्याची निर्मिती (२.६.२०१४)

* सलग दुसऱ्या वर्षी भारत हा पोलिओमुक्त असल्याचे जाहीर (२७.३.२०१४)
* संसदेमध्ये न्यायिक नियुक्ती, जागले संरक्षण, किशोर न्याय अधिनियम, लोकपाल विधेयक आदींना मंजुरी
* गुजरातमधील पाटन येथे ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या राणी की बाव (राणीची विहीर) आणि कुलू (हिमाचल प्रदेश) येथील ग्रेट हिमालयीन पार्क या दोन स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

* मुंबईत वडाळा ते चेंबूरदरम्यान देशातील पहिली मोनो रेल्वे सुरू तसेच, काश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकणारी कटरा-उधमपूर श्रीशक्ती एक्सप्रेस सुरू
* शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांचा मुलांशी आणि शिक्षकांशी थेट संवाद, त्यानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून महिन्यातून एकदा मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद

* जम्मू-काश्मीर राज्यात जलप्रलय, भारतीय लष्कराच्या ऑपरेशन मेघ-राहतद्वारे अडीच लाख विस्थापितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश

001

* ६७ पी चर्योमोव गॅरिसमेन या धुमकेतूवर रोसेटा मिशन अंतर्गत फिललँडर हे प्रोब १२.११.२०१४ रोजी उतरले. मानवी इतिहासात प्रथमच धुमकेतूवर यान अथवा प्रोब उतरविण्यात यश आले.
* आपल्या ताऱ्याभोवती ७०४ दिवसांत परिभ्रमण पूर्ण करणाऱ्या केपलर ४२१ बी या नव्या ग्रहाचा शोध अमेरिकी अवकाशशास्त्रज्ञांनी लावला.

* संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाद्वारे जीएसएलव्ही डी ५ या उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे जी सॅट १४ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. असा पराक्रम करणारा भारत जगातील सहावा देश.
* परंपरागत पेसमेकरच्या एक दशांश इतक्या लहान आकाराच्या ताररहित पेसमेकरची निर्मिती करण्यात यश (१४.२.२०१४)

* भारताचे मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले. जगात असा पराक्रम करणारा चौथा देश, अवघ्या ४५० कोटी रुपयांमध्ये जगातील सर्वात स्वस्त मंगळमोहिम. (२५.७.२०१४)
* देशात प्रथमच देवनागरी लिपीत संकेतस्थळाचे नांव विकसित करण्याचा मार्ग मोकळा, . भारत या नावाने डोमेन नेम देण्यास प्रारंभ (२१.८.२०१४)

002
* स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी सार्वमत, स्वातंत्र्यविरोधकांची सरशी (१८.९.२०१४)
* इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादाचे जगावर वाढते संकट, पाश्चिमात्य राष्ट्रे-भारत यांच्यासह इतर इसिस समर्थक, नृशंस हत्याकांडे, अनेकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणे आणि इराक-सीरिया पट्टय़ात अखंड युद्ध यामुळे दहशतीचे सावट

* हाँगकाँगमध्ये लोकशाही असावी या मागणीसाठी युवकांनी सुरु केलेल्या आंदोलनाने क्रांतीचे रूप धारण केले, जगभरात चीनचे इशारे, पोलिसांची आंदोलकांविरोधातील कारवाई यामुळे अंब्रेला क्रांती असे नामकरण
* रशियाकडून युक्रेनवर चढाई, तसेच क्रायमिया रशियात विलीन करण्याच्या करारावर २१.३.२०१४ रोजी स्वाक्षरी

* थालंडमध्ये राजकीय अनागोंदी, पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्या अन्याय्य आणि मनमानीखोर राजवटीविरोधात जनता रस्त्यावर, सरकारी कार्यालये जनतेने ताब्यात घेतली. २.३.२०१४ रोजी देशभरात आणिबाणी जाहीर
* स्वीडन येथील गोथेनबर्ग विद्यापीठात प्रत्यारोपित गर्भ बसविलेल्या महिलेला गर्भधारणा होऊन तिने सुदृढ बाळाला जन्म दिला.

* मलेशिया एअरलाईन्सचे एमएच ३७० हे विमान बेपत्ता झाले. २४ मार्च रोजी दुर्घटनाग्रस्त होऊन विमान महासागरात बुडाल्याची मलेशियाच्या पंतप्रधानांची घोषणा

003

* संरक्षण, विमा आणि रेल्वे या तीनही क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीस चालना देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
* कॉनकॉर, ईआ़ईएल आणि एनबीसीसी या कंपन्यांना भारत सरकारतर्फे नवरत्न कंपन्यांचा दर्जा बहाल करण्यात आला. (५.८.२०१४)
* बांधकाम आणि रियल इस्टेटच्या क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचे नियम शिथील केले (२१.१०.२०१४)

* प्रधानमंत्री जनधन योजना आणि पं. दीनदयाळ उपाध्याय श्रमेव जयते कार्यक्रमांची घोषणा (१५.८.२०१४ आणि १७.१०.२०१४)
* भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे भारत बील भरणा यंत्रणेचा प्रस्ताव, कोठेही आणि कधीही बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या प्रस्तावाच्या मार्गदर्शक सूचना ७.८२०१४ रोजी जारी करण्यात आल्या.

* पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करणारी आयडीएफसी आणि अल्प रकमेची कर्जे देणारी बंधन फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लि. या दोन वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना बँक स्थापन करण्याचा परवाना (२.४.२०१४)
* एअर इंडिया या भारतातील अग्रगण्य नागरी विमान वाहतूक कंपनीला स्टार अलायन्सचे सदस्यत्व (२४.६.२०१४)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2014 11:54 am

Web Title: major happenings in india 2014
टॅग New Year,Politics,Space
Next Stories
1 सोहराबुद्दीन प्रकरण : अमित शहा आरोपमुक्त
2 ईशान्य भारतीयांना भेदभावापासून कायदेशीर संरक्षण !
3 ‘पार्टी फर्स्ट’साठी सारेच सज्ज!
Just Now!
X