News Flash

मानखुर्दजवळ रेल्वे रूळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पनवेलहून सीएसटीकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वे

मानखुर्दजवळ रेल्वे रूळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक २५ मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलहून सीएसटीकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून येथील लोकल उशिराने धावत आहेत.

सकाळी ६.२५ च्या सुमारास रेल्वे रूळाला तडे गेल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने या रूळाची दुरूस्ती करण्यात आली आहे. परंतु विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सुरळित होण्यास वेळ लागणार असल्यामुळे पनवेलहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 7:41 am

Web Title: mankhurd railway track crack harbour line railway running late
Next Stories
1 राज्यात भाजपचाच क्रमांक पहिला
2 मुंबई विद्यापीठाचे निकाल पुन्हा रखडले
3 अपघातांत वाढ, पण अपघाती मृत्यूंत घट
Just Now!
X