धारावीमधील प्रेमनगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेवर मंगळवारी मध्यरात्री याच भागात राहणाऱ्या अमिर मुल्ला खान याने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला आणि त्याचा साथीदार राजेश राम लोधी यांना अटक केली.मंगळवारी रात्री पीडित महिलेचा पती कामावर गेला होता. ही संधी साधून मध्यरात्री दोनच्या सुमारास अमिर व राजेश तिच्या घरात घुसले. राजेश घराबाहेर पहारा देत थांबला तर खानने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. राजेशसुद्धा तिच्यावर बलात्कार करण्याच्या तयारीत होता. पण महिला अस्वस्थ झाल्याचे पाहून त्यांनी पळ काढला. पती घरी आल्यावर महिलेने त्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. धारावी पोलिसांनी बुधवार सकाळीच दोन्ही आरोपींना अटक केली.