आर्थिक राजधानीत ११ महिन्यांत २३४ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव, अनियमित तपासण्या कारणीभूत

शैलजा तिवले, मुंबई</strong>

10 Year Old Girl Dies of Cake Due To Artificial Sweetener
१० वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या केकमध्ये ‘हा’ पदार्थ झाला होता जास्त; तुम्हीही व्हा सावध, हे त्रास ओळखा
old lady dies with 5-year-old grandson in tanker accident
टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू
Accident Image
लातूरमध्ये लग्नघरावर शोककळा; लग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू
venus planet transit in mee shukra transit in pisces these zodiac sign will be success all sector
शुक्र २४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील विराजमान, ‘या’ तीन राशी होणार मालामाल?

गेल्या दोनोर्षांत खाली आलेला शहरातील मातामृत्यू दराचा आलेख यावर्षी पुन्हा वाढला आहे. गेल्या वर्षभरात (नोव्हेंबपर्यंत) शहरामध्ये २३४ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला असून मातामृत्यू दर १४४ वरून १७२ वर पोहचल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून निदर्शनास येते. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव, गर्भधारणेच्या काळात अनियमित तपासण्या, प्रकृती गंभीर झाल्यानंतर जवळच्या शहरांमधून प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या माता यामुळे प्रसूतीदरम्यानची गुंतागुत वाढते आणि परिणामी मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

२०११ पासून मातामृत्यू दर वाढतो आहे. २०१६ पर्यंत हा दर २०० वर पोहचला. दरम्यान उपनगरीय रुग्णालयांवर विशेष भर पालिकेने दिल्यानंतर तो कमी करण्यात पालिकेला काही प्रमाणात यश आले. २०१८ साली शहरात मातामृत्यू दर १४४ नोंदला होता, परंतु हे आशादायक चित्र अल्पजीवी ठरले आहे. २०१९ या वर्षभरात मातामृत्यू दर पुन्हा वाढून २०१४ इतका झाला आहे. जानेवारी ते २७ डिसेंबपर्यंत शहरात २५४ मातांचा मृत्यू झाला असून यात १२९ शहरातील, तर १२५ शहराबाहेरील मातांचा समावेश आहे. दर एक लाख प्रसूतीमागे (लाइव्ह बर्थ) मातांचा मृत्यू यानुसार हा दर ठरतो.

मुंबईजवळील कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर, पनवेल या भागांतूनही मोठय़ा प्रमाणात महिलांना प्रसूतीसाठी शहरातील शीव येथील लोकमान्य टिळक, नायर, केईएम रुग्णालयात पाठविण्यात येते. या विभागांमध्ये दर्जेदार आणि अत्याधुनिक प्रसूती सेवा उपलब्ध नसल्याने प्रकृती गंभीर झाल्यानंतर बऱ्याचदा रुग्णांना पाठविले जाते. परिणामी, शहराबाहेरून येणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वसाधारणपणे शहराइतकेच नोंदले जाते. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव हे प्रामुख्याने कारण आढळले आहे. तसेच तिशीनंतर माता होण्याचे प्रमाण अलीकडे वाढते आहे. याचाही माता मृत्यूदर वाढण्यावर परिणाम होत असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

शहरातील मातांबाबतचे निरीक्षण नोंदविताना लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे युनिटप्रमुख डॉ. राहुल मयेकर सांगतात, ‘झोपडपट्टी किंवा विशेषत: स्थलांतरित माता नियमित तपासण्या करत नाहीत. त्यामुळे गर्भधारणेनंतर पुढील नऊ महिन्यांमधील संभाव्य धोक्यांचे निदान केले जात नाही. काही महिला तर नोंदणी करून गावी निघून जातात. त्यानंतर थेट नवव्या महिन्यात प्रसूतीसाठी दाखल होतात. मधल्या काळात कोणत्याही चाचण्या, औषधोपचार घेतलेले नसतात, असाही अनुभव आहे. अशा महिलांमध्ये ऐन प्रसूतीदरम्यान अनेक अडचणी येतात.

’ नऊ महिन्यांमध्ये महिलांचा आहार, फॉलिक अ‍ॅसिडसारखी औषधे याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रक्तक्षय निर्माण होतो. या महिलांना प्रसूतीनंतर थोडा जरी रक्तस्राव झाला तरी शरीराला धोका होण्याचा संभव असतो. त्यामुळेही रक्तस्रावाच्या कारणाने मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आढळते. तसेच गर्भावस्थेत संसर्गजन्य आजारांची होणारी लागण हेही मातामृत्यूचे अजून एक कारण असल्याचे डॉ. मयेकर यांनी मांडले.

पालिकेची उपनगरीय रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्ये योग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव यामुळे तिथे नोंदणी करूनही भविष्यात योग्य उपचार मिळावेत म्हणून पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्येही माता नोंदणी करतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्यसेवेच्या विकासावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

सहा वर्षांतील माता मृत्यूचे प्रमाण

वर्ष               मृत्यू झालेल्या मातांची संख्या   मुंबईतील  माता    शहराबाहेरील  माता    माता मृत्यूदर

२०१४                                  २९९                           १४४                         १५५                      १७२

२०१५                                  ३१४                           १६८                          १४८                      १८०

२०१६                                   ३०५                          १५०                          १५५                       २००

२०१७                                   २३६                          १२८                          १०८                       १५३

२०१८                                    २१८                        १२३                             ९५                         १४४

२०१९                                     २३४                       ११८                             ११६                       १७२

(नोव्हेंबरपर्यत )

प्रभावी उपाय

’ संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मातांनी नियमित पिण्याचे पाणी उकळून पिणे, मच्छरदाणीचा वापर करणे अत्यावश्यक

’ गर्भावस्थेत पहिल्या महिन्यापासून प्रसूतीपर्यंत सातत्याने तपासणी करणे आवश्यक

’ संतुलित आहार आणि औषधांचे नियमित सेवन