News Flash

एमबीए पदवीधरांसाठीही ‘आयआयटी’कडे धाव

व्यवस्थापन पदवीधरांनाही ‘लाख’मोलाची नोकरी

व्यवस्थापन पदवीधरांनाही ‘लाख’मोलाची नोकरी
उत्कृष्ट अभियंता हवा असेल तर देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेक कंपन्या सर्वप्रथम ‘आयआयटी’कडे वळतात. मात्र व्यवसाय व्यवस्थापन अर्थात एमबीए पदवीधरांसाठीही कंपन्यांनी ‘आयआयटी’कडे धाव घेतली आहे. मुंबई ‘आयआयटी’मध्ये नुकत्याच पार पडलेल्या नोकरी फेरीत शिकत असलेल्या २६ विद्यार्थ्यांसह १०० पदवीधरांना ‘लाख’मोलाची नोकरी मिळाली आहे.
या नोकरी फेरीत कंपन्यांनी देऊ केलेल्या वार्षिक पगाराची आकडेवारीही कमीत कमी १६.५ लाख तर जास्तीत जास्त २७.५ लाख रुपये इतकी आहे. यामुळे आयआयटी मुंबईतील ‘शैलेज जे. मेहता व्यवस्थान शिक्षण संस्थे’चा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. संस्थेत दरवर्षी पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी या उद्देशाने भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. त्यामध्ये यंदा ४९ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यानी गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत वर्षांला तब्बल १० लाख रुपये पगार जास्त देऊ केला आहे.
या वर्षी संस्थेतील विद्यार्थी क्षमता ५० टक्क्यांनी वाढविण्यात आली होती. यामुळे शैक्षणिक वर्ष २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी संस्थेत ११७ विद्यार्थी शिकत होते. यापैकी १०० विद्यार्थ्यांना कंपन्यांनी नोकरी दिली असून यात २६ विद्यार्थ्यांना शिकत असतानाच नोकरी मिळाली. संस्थेतील भरती प्रक्रियेत वित्त आणि विमा क्षेत्रातील गोल्डमन सॅक, येस बँक, नरोमा, पीडब्ल्यूसी, आयसीआयसीआय, इंडस व्हॅली सारख्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर उत्पादन क्षेत्रातून टाटा मोटर्स, एचपी, कमिन्स, जिंदाल स्टील सारख्या कंपन्याही सहभागी झाल्या होत्या.

उन्हाळी सत्रालाही दोन लाख विद्यावेतन
याच संस्थेत २०१५-१७ या दोन वर्षांचा कालावधीत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्येही शिकत असलेल्या सर्व ११६ विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह प्रशिक्षणार्थी म्हणून नेमण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना कंपन्यांनी देऊ केलेल्या विद्यावेतनाची जास्तीत जास्त रक्कम ही दोन लाख रुपये असून सरासरी एक लाख ४० हजार ७०४ इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:49 am

Web Title: mba graduates management graduates iit
टॅग : Iit
Next Stories
1 आयपीएलची बनावट तिकिटे विकणारे अटकेत
2 चार दिवसांत ४५२ जणांच्या बदल्या
3 दुष्काळग्रस्त भागांतील बालकांवर अस्थिव्यंगाचे संकट!
Just Now!
X