News Flash

वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आजपासून

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची आता सुरुवात होत आहे.

बारावी आणि प्रवेश परीक्षांच्या निकालानंतर राज्यातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची आता सुरुवात होत आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (७ जून) सुरू होत असून ऑनलाइन अर्ज उपलब्ध होणार आहेत.

बारावीच्या निकालानंतर गेल्या आठवडय़ात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत.

यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी (एमबीबीएस) ३ हजार ८७५ जागा, तर दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी (बीडीएस) साधारण बाराशे जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी साधारण ७० हजार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी यंदा साधारण १ लाख ४१ हजार जागा उपलब्ध आहेत.

या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेश नियंत्रण कक्षाने जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपूर्वी या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची तारांबळ उडणार आहे.

वैद्यकीयसाठी १७ जूनपर्यंत अर्जमुदत

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ७ ते १७ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. त्यानंतर १८ जूनपर्यंत विद्यार्थी शुल्क भरू शकतील. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे. २१ ते २५ जूनदरम्यान विद्यार्थी कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. २६ जून रोजी सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी २६ ते २९ जून या कालावधीत महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरू शकतील. पहिली निवड यादी २ जुलैला जाहीर होईल.

मुंबई विभागातील भायखळा येथील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आणि नांदेड आणि उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थी कागदपत्रांची पडताळणी करून घेऊ शकतील.

अभियांत्रिकी प्रवेश..

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ७ जून ते १९ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतील. प्राथमिक गुणवत्ता यादी २१ जून रोजी जाहीर होईल. या यादीवर २२ आणि २३ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतील. अंतिम गुणवत्ता यादी २४ जून रोजी जाहीर होणार असून २५ ते २८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. त्यानंतर २९ जून रोजी प्रवेश यादी जाहीर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 1:29 am

Web Title: medical and engineering entrance exam
Next Stories
1 २४ तासांत १,००३ विमान फेऱ्या
2 राज्यात रासायनिक खतांवर बंदी?
3 केंद्राच्या घोषणेने राज्यातील साखर उद्योगाला लाभ
Just Now!
X