News Flash

इंद्राणी मुखर्जीला डेंग्यू झालेला नाही – वैद्यकीय अहवाल

इंद्राणीवर जेजे रुग्णालयातच उपचार सुरू आहेत

इंद्राणी मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्यानंतरही ती या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. त्यामुळे त्यांना या हत्येबद्दल काही माहिती आहे का, हत्येचा हेतू काय असू शकतो, याबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळते का, याचीही तपासणी सीबीआय करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यू झाला नसल्याची माहिती गुरुवारी सकाळी जेजे रुग्णालयाकडून देण्यात आली. वैद्यकीय तपासण्यातून तिला डेंग्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इंद्राणीवर जेजे रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी दुपारी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी अशक्तपणामुळे बेशुद्ध पडल्यानेही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इंद्राणी मुखर्जी हिची तब्येत बिघडल्याने जे जे रुग्णालयातील डॉक्टरांकडून तुरुंगात तपासणी करण्यात आली. बुधवारी तिच्या प्लेटलेट्सची संख्या ६५ हजारांवर उतरली होती. इंद्राणीची तब्येत खालावल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्राणीवर मुलगी शीना बोरा हिची २०१२ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय याला ३१ ऑक्टोबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 11:17 am

Web Title: medical reports suggest that indrani is not suffering from dengue
टॅग : Indrani Mukerjea
Next Stories
1 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘पाणीपुरवठा संजीवनी’ योजना
2 वांद्रे स्थानकासाठी ‘युनेस्को’चा आराखडा
3 पाणीपुरवठय़ाच्या वेळेतील २० टक्के कपात मागे घ्या
Just Now!
X