मुंबई : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त रेल्वेने रविवारप्रमाणे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी विविध कामांनिमित्त मेगाब्लॉक घेतला जातो. ब्लॉक काळात ३० टक्के कमी लोकल फेऱ्या चालविल्या जातात. यामध्ये फेऱ्या रद्द होतानाच लोकल उशिरानेही धावतात. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्याही रद्द होतात. सुट्टीचे वेळापत्रक गणेश चतुर्थीदिवशी लागू केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. घरगुती गणपतीबरोबरच मुंबईतील मोठय़ा सार्वजनिक गणपतींचेही पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी नागरिक बाहेर पडतात. प्रवाशांची संख्या वाढते. त्यांना कमी लोकलफेऱ्यांमुळे  अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.