News Flash

 ‘बेस्ट’ प्रवाशांत घट; वाहनांची गर्दी कायम

कडक निर्बंधांचे संमिश्र परिणाम;  खासगी वाहनांची वर्दळ सुरूच

 ‘बेस्ट’ प्रवाशांत घट; वाहनांची गर्दी कायम

कडक निर्बंधांचे संमिश्र परिणाम;  खासगी वाहनांची वर्दळ सुरूच

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदीसह काही निर्बंध लागू केले असले तरी, मुंबईतील रस्त्यांवर अजूनही वाहनांची गर्दी कायम आहे. खासगी वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले असले तरी, शहरात खासगी वाहनांची वर्दळ नियमितपणे सुरू आहे. दुसरीकडे, ‘बेस्ट’च्या प्रवासीसंख्येत मात्र घट झाली असून गेल्या १५ दिवसांत नऊ लाख प्रवासी घटले आहेत.

कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनीही जागोजागी नाकाबंदी, वाहनांची झाडाझडती सुरू के ली. मात्र टाळेबंदीच्या तुलनेत कडक निर्बंधांमधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह विविध सेवा, उद्योगांना मुभा देण्यात आली. त्यामुळे बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा, अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने, या सेवांमध्ये कार्यरत व्यक्तींची खासगी वाहनांसह परवानगी असलेल्या सेवांशी निगडित वाहने रस्त्यांवर उतरली. पोलिसांनी शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांची दहिसर, मुलुंड, ऐरोली टोल नाक्यावर झडती घेण्यास सुरुवात के ल्याने वाहने खोळंबली. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह शहरात विविध ठिकाणी मेट्रो, उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणीही नेहमीप्रमाणे वाहनांचा वेग मंदावला. शहरांतर्गत किराणा, औषधे, भाजीपाला विकत घेण्यासाठी नागरिक बाहेर पडले. त्यामुळे रहदारीत  भर पडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अतिशय तातडीचे काम असलेल्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा  आहे. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झाला आहे. १५ एप्रिलला बेस्टच्या प्रवाशांची संख्या १४ लाख १२ हजापर्यंत  घटली. तर बेस्टला के वळ १ कोटी ३ लाख ८५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.

१५ दिवसांत नऊ लाख प्रवासी कमी

गेल्या १५ दिवसांत बेस्टची प्रवासी संख्या नऊ लाख २८ हजारांनी कमी झाली असून बेस्टचे उत्पन्न ७४ लाख ६२ हजार रुपयांनी आटले आहे. १ एप्रिलला बेस्ट बसमधून २३ लाख ४० हजार नागरिकांनी प्रवास केला होता. यातून बेस्टला एक कोटी ७८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. तर १५ मार्चला बेस्ट बसमधून २५ लाख १५ हजार प्रवाशांनी प्रवास के ला होता. मात्र राज्य सरकारने ५ एप्रिलला राज्यभरात जमावबंदीचा आदेश लागू के ला. करोना संसर्ग रोखण्यासाठी बेस्टच्या प्रवासी संख्येवर मर्यादा आणली. तसेच बेस्ट बसमधून उभ्याने प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यानंतर बेस्टचे प्रवासी काही प्रमाणात घटले होते. शनिवारी आणि रविवारी संचारबंदी असल्याने १० एप्रिलला के वळ ७ लाख ६६ हजार नागरिकांनी बेस्टने प्रवास के ला. तर ११ एप्रिलला रविवारी ६ लाख १८ हजार नागरिकांनी प्रवास के ला होता. मंगळवारी १३ एप्रिलला बेस्ट बसला १५ लाख २१ हजार प्रवासी मिळाले होते. तर १४ एप्रिलला बेस्ट बसमधून सुमारे १६ लाख नागरिकांनी प्रवास केला होता.

१५ हजार वाहनांवर कारवाई

गुरुवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी एकू ण १५ हजार वाहनांवर कारवाई के ली. यात कडक निर्बंधांचे उल्लंघन म्हणजे विनाकारण प्रवास, नियम न पाळणे, प्रवासी मर्यादेचे नियम मोडणाऱ्या सुमारे २० टक्के  वाहनांचा समावेश होता. यातील काही वाहनांवर ई चलन जारी करण्यात आले. तर काही वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त नंदकु मार ठाकू र यांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:07 am

Web Title: mixed effect of strict restrictions on mumbaikars zws 70
Next Stories
1 मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांत २९.९३ टक्के जलसाठा
2 घरगुती मसाले तयार करण्याकडे ग्राहकांची पाठ
3 बछडय़ाच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी तैनात
Just Now!
X