07 August 2020

News Flash

राज ठाकरेंच्या घरात करोनाचा प्रवेश; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण

या आधी तीन सुरक्षारक्षकांनाही झाली होती लागण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे करोनाने धडक दिली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक करोनामुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा करोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याआधी राज ठाकरे यांचे दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षक यांनादेखील करोनाची लागण झाली होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही करोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन प्रक्रीया करण्यात आली होती. तसेच शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी करोनाचे १,२९७ नवे रुग्ण आढळून आले. तर ११७ जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला मुंबईत २८,३६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३९,७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 11:43 am

Web Title: mns chief raj thackeray 2 people inside home tested positive of covid 19 coronavirus in krishna kunj vjb 91
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या: यशराज फिल्मसच्या दोन माजी अधिकाऱ्यांची पाच तास चौकशी
2 ‘म्हाडा’वर अविश्वास दाखविणारा आदेश मागे!
3 करोनाबाधित मृतांच्या नोंदीसाठी १ जुलैपासून नवी कार्यपद्धती
Just Now!
X