सोमवारपासून अर्थात ६ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही ते पाहणार आहेत. या आंदोलनाला कान चेक आंदोलन असे नाव देण्यात आल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटर अकाऊंटवर दिली.

प्रेक्षकांना १ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्स बाहेरचे खाद्य नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही? हे तपासले मनसेच्या कानचेक आंदोलनात तपासले जाणार आहे. अंमलबजावणी झाली नसेल तर मल्टिप्लेक्सच्या स्टाफला कानाखाली लगावून कानचेक आंदोलन होणार आहे.

हायकोर्टाने वारंवार प्रश्न विचारूनही मल्टिप्लेक्समधील खाद्य पदार्थांच्या किंमती कमी होत नव्हत्या, तसेच या किंमती कमी केल्या जाव्यात म्हणून मनसेने काही दिवसांपूर्वी मनसे स्टाईल आंदोलनही केले होते. या आंदोलनात थिएटर मालकांना मनसेच्या आंदोलकांनी मारहाणही केली. आता मनसेने कान चेक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.