मुंबई : मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर आता नवे दर मीटरमध्ये अद्ययावत करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु त्यातही येणारी तांत्रिक समस्या, आरटीओलाही दररोज न मिळणारी माहिती लक्षात घेता ही प्रक्रि या सुरळीत पार पाडण्यासाठी परिवहन विभागाने मोबाइल अ‍ॅपची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून या प्रक्रि येवर लक्ष ठेवता येणार आहे.

रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ के ल्यानंतर मीटरमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी चालक-मालकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. तोपर्यंत नवीन दरपत्रक जवळ बाळगून भाडे आकारण्याची मुभाही देण्यात आली. नवीन भाडेदरासाठी मीटर अद्ययावत करावे लागणार आहे. वाहन क्र मांकाच्या शेवटच्या क्रमांकावरून रिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावत के ले जात आहे. ते होताच चालकांना आरटीओत वाहन पासिंगसाठी बोलावण्यात येते. परंतु मीटर अद्ययावत करणे, पासिंग करणे इत्यादी प्रक्रि या करताना तांत्रिक मुद्दे व गोंधळ उडत आहे. परिणामी हा गोंधळ न होता मीटर अद्ययावत प्रक्रिया झटपट करणे व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा आधार परिवहन विभागाला घ्यावा लागला आहे.  अधिकाऱ्याचे नाव, त्याने तपासणी केलेल्या वाहनांची संख्या याची सर्व माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे नियंत्रण कक्षाला मिळणार असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मीटर फेरफाराला आळा

टॅक्सी आणि काळी पिवळी टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे भाडेवाढ करताना प्रत्येक वेळी मीटरमध्ये कंपन्यांमार्फत आवश्यक बदल केले जातात. प्रत्येक वेळी भाडेवाढ के ल्यानंतर मीटरमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यापेक्षा रिक्षा आणि टॅक्सींना जीपीएस मीटर बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. काही किरकोळ बदल के ल्यानंतर भाडे आकारणी त्वरित लागू होऊ शकते आणि मीटरमध्येही फे रफार करता येत नाही. दिल्लीत अशा प्रकारचे जीपीएस आधारित मीटर आहेत.