चंद्रपूर : नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुरभी रमाकांत कागदेलवार हिला मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी आयोजित ४१व्या ‘मान्सून आर्ट शो’चा २५ हजार रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार आर.एस. लुथ एज्युकेशन ट्रस्ट मुंबईच्या सौजन्याने देण्यात आला.

मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीतर्फे दरवर्षी ‘मान्सून शो’चे आयोजन करण्यात येते. संपूर्ण भारतातून यावर्षी केवळ शंभर चित्रकृतींची निवड करण्यात आली होती. त्यात एकटय़ा नवरगावच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांच्या कलाकृती निवडल्या गेल्या, हे विशेष.  ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयात जी.डी. आर्ट (रेखा व रंगकला) अंतिम वर्गात शिकत असलेली सुरभी मूळची उमरेडची आहे. गेल्या चार वर्षांपासून कलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी नवरगाव येथे वास्तव्याला आहे. यापूर्वीही ती अनेक पुरस्काराने सन्मानित झाली असून या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे कलाक्षेत्रात तिचे नाव उंचावले आहे.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित