गोपाळ शेट्टी १०० टक्के तर उदयनराजे यांची २८ टक्के उपस्थिती

मुंबई : भाजपचे उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी यांचा अपवाद वगळता राज्यातील एकाही खासदाराने १६व्या लोकसभेत १०० टक्के उपस्थिती लावलेली नाही. साताऱ्याचे उदयनराजे यांची २८ टक्केच उपस्थिती असून, राज्यातील खासदारांमध्ये सर्वात कमी काळ ते उपस्थित राहिले आहेत. सर्वाधिक प्रश्न राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विचारले आहेत.

खासदारांच्या उपस्थितीबाबत ‘पीएसआर लेजिस्टेटिव्ह रिसर्च’ या संस्थेने केलेल्या पाहणीत १६व्या लोकसभेच्या आतापर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनांमध्ये गोपाळ शेट्टी हे सर्व दिवस उपस्थित राहिले आहेत. सर्वाधिक प्रश्न राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विचारले आहेत. खासगी विधेयके मांडण्यात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनीच आघाडी घेतली. शेट्टी यांनी आतापर्यंत २८ खासगी विधेयके मांडली. त्यापाठोपाठ काँग्रेसचे राजीव सातव आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी प्रत्येकी १९ खासगी विधेयके मांडली. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी आतापर्यंत १३ खासगी विधेयके मांडली आहेत.

राज्यातील खासदारांच्या लोकसभेतील उपस्थितीची आकडेवारी (संदर्भ :  पीएसआर)

भाजपचे खासदार

गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) – १०० टक्के, ए. टी. नाना पाटील (जळगाव ) – ८६ टक्के, अनिल शिरोळे (पुणे) – ९४ टक्के, अशोक नेते (गडचिरोली) – ७५ टक्के, दिलीप गांधी (नगर) – ६७ टक्के, हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) – ८७ टक्के, हीना गावित (नंदुरबार)- ८२ टक्के, कपिल पाटील (भिवंडी) – ९३ टक्के, किरीट सोमय्या (ईशान्य मुंबई) – ९७ टक्के, पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई) – ७९ टक्के, प्रीतम मुंडे (बीड) – ५६ टक्के, रक्षा खडसे (रावेर) – ७६ टक्के, रामदास तडस (वर्धा) – ६१ टक्के, रावसाहेब दानवे (जालना ) – ५८ टक्के, संजय धोत्रे (अकोला ) – ८४ टक्के, संजयकाका पाटील (सांगली) – ५७ टक्के, शरद बनसोडे (सोलापूर) – ९३ टक्के, सुनील गायकवाड (लातूर) – ९७ टक्के (मंत्र्यांना हजेरी पुस्तकात नोंद करणे बंधनकारक नसते.)

शिवसेना 

आनंदराव आडसूळ (अमरावती) – ८६ टक्के, अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) – ९८ टक्के, भावना गवळी-पाटील (यवतमाळ-वाशिम) – ७६ टक्के, चंद्रकांत खैरे (औरंगाबाद) – ७३ टक्के, गजानन कीर्तिकर (उत्तर – पश्चिम मुंबई) – ७९ टक्के, हेमंत गोडसे (नाशिक) – ८८ टक्के, प्रताप जाधव (बुलढाणा)- ७२ टक्के, कृपाल तुमणे (रामटेक) – ८७ टक्के, राहुल शेवाळे (दक्षिण- मध्य मुंबई) – ९४ टक्के, राजन विचारे (७८ टक्के), रवींद्र गायकवाड (उस्मानाबाद) – ६४ टक्के, सदाशिव लोखंडे (शिर्डी) – ७३ टक्के, संजय जाधव (परभणी) – ५८ टक्के, शिवाजी आढळराव पाटील (शिरूर) – ६८ टक्के, डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण) – ८३ टक्के, श्रीरंग आप्पा बारणे (मावळ) – ९४ टक्के, विनायक राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) – ८२ टक्के.

काँग्रेस 

अशोक चव्हाण (नांदेड) – ४३ टक्के, राजीव सातव (हिंगोली) – ८१ टक्के

स्वाभिमानी शेतकरी संघटना

राजू शेट्टी (हातकणंगले) – ७९ टक्के.

पोटनिवडणुकीत अलीकडेच विजयी झालेले राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे (भंडारा-गोंदिया) – ८२ टक्के, पालघरचे राजेंद्र गावित – ८२ टक्के.

राष्ट्रवादी काँग्रेस 

सुप्रिया सुळे (बारामती) – ९६ टक्के, विजयसिंह मोहिते-पाटील (माढा) – ६२ टक्के, उदयनराजे भोसले (सातारा) – २८ टक्के, धनंजय महाडिक (कोल्हापूर) – ७३ टक्के.