मुंबईतील उघड्या गटारात पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अधिन परवेझ तांबोळी असे या मुलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अधिन खेळत होता. त्याचवेळी तो उघड्या गटारात पडला. बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या गटाराचे झाकण उघडेच ठेवले होते. ज्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका मुलाला आपला जीव गमावावा लागला आहे.

मुंबईतील चेंबूर या ठिकाणी ही घटना घडली. चिता कॅम्प परिसरात असलेले गटार मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडेच ठेवले. या गटाराची स्वच्छता केल्यावर त्याचे झाकण या कर्मचाऱ्यांनी बंद केले नाही. याच गटारात अधिन पडला. लोकांनी ही बाब पाहिली तेव्हा त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.. पण गटारातले पाणी बरेच खोल होते. त्याला कसेबसे बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रूग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. डिसीपी शहाजी उमप हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.