14 December 2019

News Flash

मुंबई : इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहचला ; बचावकार्य सुरु

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण गंभीर जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. दोन लहान मुलांना आणि एका स्त्रीला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.  ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र अधिकृतपणे दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

मृतांची समोर आलेली नावं –
१) साबिया शेख
२) अब्दुल शेख
३) मुझमिल सलानी
४) सायरा शेख

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चिंचोळी गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत.

जखमींची नावं
फिरोज नाझिर सलमान
आएशा शेख
सलमा अब्दुल सत्तार शेख
अब्दुल रहमान
नावेद सलमानी
इम्रान हुसैन कालवानिया
एक अनोळखी माणूस

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

First Published on July 16, 2019 12:21 pm

Web Title: mumbai a four storey building has collapsed in dongri area many feared trapped scj 81
Just Now!
X