मुंबई विमानतळ उडवण्याबाबत धमकीचं कोणतंही पत्र मिळालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीटीआयच्या हवाल्यातून ही माहिती मिळाल्याने विमानतळ उडवण्याची धमकी ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, काल मुंबई विमानतळ २ फेब्रुवारीच्या आधी उडवून देण्याची धमकीवजा फोन उत्तर प्रदेशातून आल्याचं वृत्त होत.  त्यावर विमानतळ नियंत्रण कक्षाकडे विचारणा केली असता फोन आला होता. मात्र, कोणतीही धमकी देण्यात आली नव्हती असे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही इसिसच्या हालचाली पाहता मुंबईसह मुंबई विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.